Pimpri case filed against actress Ketki Chitale Sharad Pawar offensive post  Sakal
पिंपरी-चिंचवड

अभिनेत्री केतकी चितळेवर पिंपरीत गुन्हा दाखल

शरद पवार यांच्याबाबत केलेली पोस्ट भोवली

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे व नितीन भावे यांना चांगलेच भोवले आहे. या दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राष्टवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर महिलाध्यक्षा कविता आल्हाट (रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. चितळे व तिचा सहकारी ऍड. भावे यांनी शरद पवार यांना उद्देशून फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. यामध्ये बदनामीकारक व मानहानीकारक मजकूर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ५०५ (२), ५००, ५०१, १५३ (अ) व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT