Chikhali Murder sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Firing : चिखलीत भरदिवसा गोळीबारात तरुणाचा खून

चिखली येथे भरदिवसा गोळ्या घालून एकाचा खून करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - चप्पल शिवण्यासाठी चौकात आलेल्या तरुणाचा दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गोळ्या घालून खून केला. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी श्री क्षेत्र टाळगाव-चिखली प्रवेशद्वाराजवळ भरचौकात घडली. तळेगाव येथे किशोर आवारे यांच्या खुनांची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (२०, रा. महादेवनगर, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीर सोमवारी दुपारी चिखली येथील श्री क्षेत्र टाळगाव प्रवेशद्वाराजवळ चप्पल शिवण्यासाठी आला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले.

नागरिकांनी सोन्या तापकीर याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोन्याचा मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. त्यामुळे चिखली परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दोन संशयीतांची नावे निष्पन्न

अवघ्या काही तासांच्याआत चिखली येथील हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई, खेड), सिद्धार्थ कांबळे यांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत. यामध्ये वर्चस्ववादाची पार्श्‍वभमी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच, मयत सोन्या तापकीर याची काही दिवसांपूर्वी संशयित तरुणांशी भांडणे झाली होती. या भांडणातूनच हा खून केल्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: भाषांपासून अंतराळ केंद्रापर्यंत! पुण्यातील सरकारी शाळेतील मुलांची नासामध्ये निवड; विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय

Maharashtra: आता लहान मासे पकडले तर थेट कारवाई! माशांच्या पुनरुत्पादनासाठी महायुती सरकारचा ‘गेम चेंजर’ निर्णय

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

Video : कॅन्सरसही लढा देणाऱ्या मुलीने डॉक्टरसोबत बनवली रील; 'तडपाओगे..' गाण्याने भावुक झाले लोक, मृत्युच्या दारातला व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: ठाण्यात मनसे-ठाकरे सेनेचा मोर्चा

SCROLL FOR NEXT