PCMC
PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : त्रिसदस्यीय प्रभागाला छोट्या पक्षांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश अद्याप निघालेला नाही. मात्र, तीन सदस्यीय असो, की गेल्या वेळेप्रमाणे चार सदस्यीय अशा बहुसदस्यीय पद्धतीत निवडणूक लढवण्याची भीती छोट्या पक्षांना वाटत आहे. आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असून तीन सदस्यीय पद्धतीस विरोध केला आहे.

महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात निवडणूक होण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने गेल्या आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप आदेश निघालेला नाही.

त्रिसदस्यीय पद्धतीस काही पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याची शक्यता आहे. मात्र, तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग रचनेस छोट्या पक्षांचा विरोध आहे. तरीही निवडणूक लढवण्याची तयारी त्यांच्याकडून सुरू आहे. बैठका, मेळावे, आयोजित केले जात आहेत.

तीन सदस्यीय प्रभाग पद्धती छोट्या पक्षांना मारक आहे. एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग त्यांच्यासाठी ठीक आहे. मोठ्या पक्षांनी त्यांच्या सोयीसाठी घेतलेला हा निर्णय आहे. गेल्या वेळी चार सदस्यीय पद्धतीला आम्ही विरोध केला आता तीन सदस्यीय पद्धतीलाही विरोध आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही आहे.’’

- चंद्रकांता सोनकांबळे, सरचिटणीस, प्रदेश महिला आघाडी, आरपीआय (आठवले गट)

‘एक मत-एक मूल्य’ ही संकल्पना संविधानाने दिली आहे, त्याची पायमल्ली बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्यास होणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. प्रभाग पद्धतीत प्रभागाला आरक्षण देण्याऐवजी उमेदवाराला आरक्षण दिले जाते, याला आमचा विरोध आहे.

- देवेंद्र तायडे, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पिंपरी-चिंचवड

त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यास आमचा विरोध आहे. हा निर्णय संविधानाला काळिमा फासण्यासारखा आहे. मोठ्या पक्षांनी त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. पैसे वाटणारा निवडून येऊ शकतो, ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे.

- रामदास ताटे, शहराध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT