corona sakal media
पिंपरी-चिंचवड

Pimpri : कोरोना घटल्याने बेफिकिरीत वाढ

मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत घट

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने बिनधास्त झालेल्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटून, २० टक्क्यांपर्यंत आली आहे. नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आता आपल्याला काहीच होणार नाही, अशा आविर्भावात गेल्या काही महिन्यांपासून बिनामास्कचे वावरताना दिसत आहेत. हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रेपान ८ वर

"शहरातील हॉटेल, मोठ्या संस्था, तसेच रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरचा वापर सुरू आहे. मात्र, छोट्या दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवले जात असले, तरी त्याचा वापर होत नसल्याचे दिसते. ‘एन ९५’ मास्कची मागणी सप्टेंबरपासून कमी झाली आहे."

- विवेक तापकीर, उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रिक्ट

मास्कची विक्री मंदावली

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर ‘एन ९५’, तसेच अन्य प्रकारच्या सर्जिकल मास्कचा वापर सुरू झाला. त्या वेळी ६० टक्क्यांवर सुरू असलेली विक्री मे महिन्यात १०० टक्क्यांपर्यंत वाढली. मात्र, त्याचा खप जूनपासून कमी होत गेला. जुलैमध्ये ७० टक्के असलेली ‘एन ९५’, मास्कची विक्री ऑक्टोबरपर्यंत ३० टक्क्यांपर्यंत खाली आली. त्या वेळी ‘एन ९५’ मास्क, तसेच सर्जिकल मास्क वापरण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झाले. आता ऑक्टोबरपासून मास्क, तसेच सॅनिटायझरचा खप आणखीनच कमी होऊन साधारणतः १५ ते २० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी दिली.

सॅनिटायझरची मागणी कमी

सुजय जेनेरिक स्वस्त औषध विक्रेते वर्षा भालेराव यांनी सॅनिटायझरचा वापर ५० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविले. त्या म्हणाल्या, ‘‘मे नंतर वापर कमी झाल्याने विक्री कमी झाली. रुग्ण वाढण्याची भीती कमी झाली आहे. परिणामी, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध असले, तरी मर्यादित स्वरूपात त्याचा वापर सुरू आहे. सोसायट्यांकडूनही मागणी कमी झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

देवाला घातलेली आर्त साद ; ‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

Pune Prohibitory Orders: पुण्यात २६ मेपासून १४ दिवस जमावबंदी; मोर्चे, मिरवणुका, शस्त्रबाळगणे व भडकावू ‘रिल्स’वर कडक निर्बंध

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

SCROLL FOR NEXT