pimpri chinchwad corporation sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात होणार १३९ नगरसेवक

नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवकांची संख्या ११ ने वाढणार आहे.‌ सध्याच्या 128 ऐवजी 139 नगरसेवक आगामी काळात असतील.

महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार फेब्रुवारीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मत्रीमंडळ बुधवारच्या बैठकीत महापालिका सदस्य संख्यावाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश दिले होते, आता नवीन सदस्य सन्ख्येप्रमाने रचना करावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणने प्रमाणे १७ लाख २६ हजार आहे. सरकारने १२ लाख लोकसंखेला १२६ नगरसेवक आणि त्या पुढील ४० हजार लोकसंख्येला एक या प्रमाणे सदस्य असतील, असा निर्णय केला आहे. त्यानुसार शहरातील नगरसेवकांची संख्या अकराने वाढणार आहे.

सध्या चार सद्स्याचा एक प्रभाग नुसार ३२ प्रभाग आहेत. नवीन रचनेत यापूर्वी तीन सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे १२८ नगरसेवकांचे ४३ प्रभाग होणार होते. आता ४६ प्रभाग होतील. त्यातील ४५ प्रभागात तीन सदस्य आणि एका प्रभागात चार सदस्य असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT