पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये जाण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्या घटनेला मंगळवारी (ता. 11) पाच महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली. लॉकडाउनच्या माध्यमातून जमाव व संचारबंदी अनुभवली. रुग्णालयांसमोर रुग्णांच्या रांगा बघितल्या. अजूनही त्यात फरक पडलेला नाही. शिवाय, वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाला आहे. 

शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता तात्पुरती रुग्णालये (जम्बो फॅसिलिटी) उभारले जात आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. शहराने पुन्हा रेडझोनमध्ये प्रवेश केला आहे. मृतांचा आकडा वाढतो आहे. परिस्थिती गंभीर असताना नागरिकांच्या सोयीसाठी काही प्रमाणात नियम शिथिल केले. बाजारपेठ खुली केली. पण, प्रशासनाच्या सूचनांकडे काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत आहे. पिंपरी कॅम्पसारख्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र सोमवारी (ता. 10) बघायला मिळाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या आदेशांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर 14 ते 23 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विशेष लॉकडाउन जाहीर केला होते. जमाव व संचारबंदी होती. अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करावे, हा या मागील हेतू होता. या कालावधीत आठ हजार 599 रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराचा समावेश रेडझोनमध्ये झालेला आहे. या बाबत सरकारकडून नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. सध्या नियमात बदल केला जाणार नसला तरी, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण आढळल्यास ती आस्थापना बंद करण्यात येईल. रेडझोनमध्ये शहर असणे निश्‍चितपणे मानवणारे नाही. मोठ्या संख्येने रुग्ण सापडलेल्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या. नागरिकांनी बाहेर पडताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 

गेल्या पाच महिन्यात... 

  • एकूण रुग्ण : 29,860 
  • बरे झाले : 20,664 
  • मृत्यू : 498 
  • सक्रिय रुग्ण : 7998 
  • (सोमवारी दुपारी चारपर्यंत) 

रुग्णांचे वयानुसार वर्गीकरण 

वयोगट : रुग्ण 
0 ते 12 : 2532 
13 ते 21 : 2661 
22 ते 39 : 12275 
40 ते 59 : 9121 
60 पेक्षा अधिक : 3271 
(सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत) 

"शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाल्याने सरकारकडून कडक नवीन नियमावली लागू होऊ शकते. कोरोनाविरुद्ध लढा देताना स्वतःला वाचविण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.'' 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT