Vaccination Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात सोमवारी कोव्हिशिल्डचे २४,५००; कोव्हॅक्सिनचे २८०० डोस उपलब्ध

कोरोना प्रतिबंधक लशीचे २७ हजार ३०० डोस महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे २४ हजार ५०० व कोव्हॅक्सिनचे दोन हजार ८०० डोसचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लशीचे २७ हजार ३०० डोस महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे २४ हजार ५०० व कोव्हॅक्सिनचे दोन हजार ८०० डोसचा समावेश आहे. ते देण्याची व्यवस्था सोमवारी (ता. ४) अनुक्रमे ४९ व आठ अशा ५७ केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्डचे पाचशे व कोव्हॅक्सिनचे साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. तसेच, स्तनदा माता व गर्भवतींसाठी नवीन भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी व जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत.

अशी मिळणार लस

कोरोना प्रतिबंधक लशीचे पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT