शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.

अविनाश म्हाकवेकर | avinash.mhakawekar@esakal.com

पिंपरी : रावेत (Ravet) येथील जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी (Thursday) (ता.२९) शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळचा पुरवठा केल्यानंतर शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी (friday) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता असल्याचे आहे. (Pimpri Chinchwad city water supply closed Thursday)

शहराला मावळातील पवना धरणातून (pavana dam) पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पुरवठा केला जातो. रावेत येथील अशुद्ध जलउपसा विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती, निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

याच कामासाठी गुरुवारी शहरातील पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT