Corona 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : तरुणांना गाठतोय कोरोना

सकाळवृत्तसेवा

नवीन रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील संख्या अधिक
पिंपरी - नव्याने कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या दृष्टीने शहरातील कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत. सध्या १७ ठिकाणी लस देण्याची व्यवस्था असून, लसीकरण केंद्रांची संख्या ५० करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. सध्या महापालिकेचे आठ व खासगी नऊ केंद्र आहेत. त्यांची संख्या वाढवून दिवसाला नऊ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे सांगून आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या तपासण्या आणि लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तरुण आहेत. ८५ टक्के रुग्ण ६० वर्षांखालील आहेत. कोरोना प्रतिबंध उपाययोजनेसाठी जिजामाता आणि नविन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटही सुरू करणार आहे. पंचवीस बेड क्षमतेचे हे आयसीयू असतील. त्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सात हॉटस्पॉट
शहरात ११७ मेजर व ४७७ मायक्रो, असे ५९४ कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. चिंचवड, पिंपरी, निगडी, भोसरी, वाकड, काळेवाडी, आकुर्डी हे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.

  • १ लाख २ हजार - लसीचे उपलब्ध डोस
  • ४५० - आयसीयू बेड
  • ११० - आयसीयूत रुग्ण
  • ३५ - व्हेंटिलेटरवर रुग्ण
  • १२७ - व्हेंटिलेटर उपलब्ध

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT