corona vaccine corona vaccine
पिंपरी-चिंचवड

Pimpri : शुक्रवारी कोव्हिशिल्ड लशीचे ३२ हजार ३०० डोस

कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ८०० आणि कोव्हिशिल्ड लशीचे २९ हजार ५०० असे ३२ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ८०० आणि कोव्हिशिल्ड लशीचे २९ हजार ५०० असे ३२ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (ता. ८) अनुक्रमे आठ व ५९ अशा ६७ केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर तीनशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी ५० डोस पहिला व अडीचशे डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2026

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT