corona vaccination corona vaccination
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

पालिकेच्या वैद्यकीय विभागाची माहिती; ६८ केंद्रांवर लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे २२ हजार ५०० व कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ७०० डोस उपलब्ध झालेले आहेत. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (ता. २७) अनुक्रमे ६० व आठ अशा ६८ केंद्रांवर केली आहे. दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तनदा माता व गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, शिवतेजनगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे.

प्रत्येक केंद्रावरील १० टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून, ३० टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ६० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गरोदर महिलांना आठ केंद्रांवर लस

गरोदर महिला व स्तनदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी काही डोस राखीव ठेवले असून, केंद्रावरच नोंदणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT