Pimpri-Chinchwad Municipal Corporation 
पिंपरी-चिंचवड

प्रभागनिहाय मतदार विभाजनाचे काम मुदतीत पूर्ण करा : आयुक्तांच्या सूचना

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पर्यवेक्षक आणि प्रगणकांना मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या भारत निवडणूक आयोगाच्या यादीतील प्रभागनिहाय मतदार विभाजनाचे काम सुरू आहे. ते काम नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आज (ता.१२) दिल्या. (Pimpri Chinchwad Corporation Election)

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पर्यवेक्षक आणि प्रगणकांना मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्राधिकृत अधिकारी प्रशांत जोशी, सहाय्यक प्राधिकृत अधिकारी अजय चारठाणकर, विजयकुमार थोरात, रविकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, अभिजित हराळे, शीतल वाकडे यांच्यासह पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.

प्रारूप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजनाचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक प्राधिकृत अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महापालिका उपअभियंत्यांना पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर लिपिक, स्थापत्य सहाय्यक, ग्रंथपाल कम लिपिक, मीटर निरीक्षक आदी कर्मचाऱ्यांकडे प्रगणकांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सहा यादी भागाचे काम प्रत्येक प्रगणकाने करायचे आहे. ता.२४ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी मतदान यादीतील मतदार महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग नकाशाप्रमाणे कोणत्या निवडणूक प्रभागात समाविष्ट होतो, याची निश्चिती केली जाणार आहे. ता.२४ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात कितीला मिळतंय सोनं?

Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk : हसन मुश्रीफांच्या गडालाच खिंडार? कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीत क्रॉस व्होटिंगची चर्चा; नवीद मुश्रीफ आणि शशिकांत खोत यांच्यात चुरस

Panvel-Karjat Local: दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत, पनवेल-कर्जत मार्गाला गती; डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : 'तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?' गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी

Bombay Dorid Slug : हर्णेच्या समुद्रकिनाऱ्यावर दडलाय रंगीबेरंगी खजिना! 'बॉम्बे डोरिड स्लग' या अत्यंत दुर्मिळ सागरी जीवाची पहिलीच नोंद, अभ्यासकही थक्क

SCROLL FOR NEXT