Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोव्हिशिल्डचे रविवारी १९ हजार, कोव्हॅक्सिनचे ३२०० डोस उपलब्ध

कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीचे १९ हजार व कोव्हॅक्सिन लशीचे तीन हजार दोनशे असे २२ हजार दोनशे डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीचे १९ हजार व कोव्हॅक्सिन लशीचे तीन हजार दोनशे असे २२ हजार दोनशे डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था रविवारी (ता. ३) अनुक्रमे ३९ व आठ अशा ४७ केंद्रावर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेऊन, २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर चारशे डोस उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन, ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी व निळूभाऊ फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर प्रत्येकी एक हजार डोस उपलब्ध आहेत. अन्य केंद्रांवर प्रत्येकी पाचशे डोस आहेत. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे.

‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

कोव्हॅक्सिन लस येथे मिळेल

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी.

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी नवीन भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT