Pimpri Chinchwad Dead body found village young man from Hinjewadi IT crime police ionvestigation  Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad : खेडमध्ये आढळलेला मृतदेह; हिंजवडी ‘आयटी’तील तरुणाचा

मृतदेहाची ओळख पटविण्यात खेड पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा

कडूस - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा हिंजवडी आयटी पार्क फेजमधील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. एबीसी जंक्शन आकुर्डी, मूळ रा. शिर्डी) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो २८ जुलैपासून बेपत्ता होता.

पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या खेड घाटात सांडभोरवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता. ६) कुजलेला मृतदेह आढळून आला होता. डोंगराच्या उतारातील झाडेझुडपे व वाढलेल्या गवताच्या रानात मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात खेड पोलिसांना यश आले.

२८ जुलैपासून बेपत्ता असलेल्या व हिजवंडी आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सौरभ पाटील याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा खून झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणीअंती समोर आले आहे.

सौरभ याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने नातेवाईक संदीप सोनवणे यांनी आठवड्याभरापूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दिली होती. सौरभ याची दुचाकी होलेवाडी (ता. खेड) परिसरात एका शेतात आढळून आली होती. लगतच विहिरीच्या कठड्यावर गाडीची चावी पोलिसांना मिळाली. खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT