Crime News Crime News
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पोलिस भरतीत डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

पिंपरी - चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेत डमी बसवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात उमेदवारांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी - चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेत डमी बसवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात उमेदवारांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नुगुसिंगे, रणजीतसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मिक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस भरती सेलचे उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मैदानी, शारीरिक चाचणी झाली. सोमवारीच या भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेदरम्यान १९ नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत लेखी परीक्षा क्रमांक, चेस्ट नंबर असलेल्या या सात उमेदवारांनी डमी बसविले. आरोपींनी या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत पडताळणी समितीतील सदस्यांचीही खात्री पटली असून याबाबतचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आरोपींनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT