pimpri chichwad  sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad : दोन कोटी रुपयांची वीजचोरी उघड

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महिन्यातून विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे प्रादेशिक विभागात महावितरणकडून एका दिवसाच्या ‘विशेष मोहिमे’त अनधिकृत वीजवापर करणाऱ्या एक हजार ७२७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यात वीज तारेवर हूक टाकून वीज चोरी करणाऱ्या आणि मीटरमध्ये फेरफार केलेल्या एक हजार ३९० व्यक्तींचा समावेश आहे.

पुण्यासह पाच जिल्ह्यांत १३ लाख ४९ हजार युनिट म्हणजे दोन कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली.वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे.

त्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महिन्यातून विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पुणे विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोहिमेला सुरवात झाली.

घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या १९ हजार ९०० वीजजोडण्या तपासण्यात आली. देयकांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्धही फौजदारी कारवाई करण्यात येईल.

ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापरानुसार देयकाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नाळे यांनी सांगितले.

एकूण १,७२७ ठिकाणी २,१९,७८,००० हजार रुपये मूल्य असलेला अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT