Sureshbhai Sonawane Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोनवणे यांचे निधन

राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष सुरेशभाई सोनवणे (वय ७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राष्ट्रीय काँग्रेसचे (National Congress) पिंपरी-चिंचवड शहराचे (Pimpri Chinchwad City) माजी अध्यक्ष सुरेशभाई सोनवणे (Sureshbhai Sonawane) (वय ७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन (Death) झाले. ते महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध वक्ते होते. त्यांच्यामागे पत्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या लता भिसे-सोनवणे व पूत्र कबीर, असा परिवार आहे. (Pimpri Chinchwad Former Congress City President Sureshbhai Sonawane Passed Away)

सोनवणे यांचे जन्मगाव पाळधी (जि. जळगाव) असून सोलापूर, सातारा व पुणे येथे शिक्षण झाले. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून अभ्यासू वक्ता म्हणून ते पुढे आले आणि युवक काँग्रेसचे काम करू लागले. प्रा. रामकृष्ण मोरे, उल्हासपवार यांचे ते समकालीन होते. यानंतर ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड निवडले आणि १९८६साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेसला कायम बहुमत असे.

खराळवाडी भागाचे नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, अप्पू घर, चिंचवड भाजी मंडई असे अनेक प्रकल्प उभारण्यात मोठी भूमिका बजावली. महापालिका कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू होण्यामध्ये त्यांचा वाटा होता. महापालिकेजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वॉर्डातील झोपडपट्टी उठवून भाडेकरूसह सर्वांना निगडी ओट्यावर पर्यायी जागा दिल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये हॉकीसाठी पॉलीग्रास मैदान त्यांनी तयार केले. भारिप-बहुजन महासंघातर्फे आमदारकीची निवडणूक लढवली होती. परंतु ते परत काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर राष्ट्रवादीबरोबरच राहिले. राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT