pimpri chinchwad girl died after iron gate collapsed in Bopkhel Video goes viral  
पिंपरी-चिंचवड

Video : लोखंडी गेट अंगावर पडून पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरडीचा मृत्यू; घटनेच्या व्हिडीओने खळबळ

Pimpri Chinchwad gate collapsed Video : गिरीजा शिंदे असे या मृत मुलीचे नाव असून पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात ही घटना घडली.

रोहित कणसे

घराच्या परिसरात खेळताना साडे तीन वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावर लोखंडी गेट पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरीजा शिंदे असे या मृत मुलीचे नाव असून पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात ही घटना घडली. समोर आलेल्या व्हिडीओत एक लहान मुलाने स्लाइडींग गेट ओढल्यानंतर ते मुलीच्या अंगावर पडल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारची असून बोपखेल येथील गणेश नगर परिसरात घडली. बुधवारी दुपारच्या सुमारात गिरीजा आणि काही इतर मुले खेळत होते. एका मुलीसोबत गिरीजा धावत होती. मात्र एका मुलाने इमारतीचे लोखंडी स्लायडर गेट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटमध्ये बिघाड झालेला असल्याने ते गिरीजाच्या अंगावर पडले. थोड्या वेळाने एका व्यक्तीने पळत येऊन ते लोखंडी गेट उचलले.

यानंतर गिरीजाला उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेत चिमुरडीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT