oxygen
oxygen Esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!

पिंताबर लोहार

‘ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पुरेसा नाही’ ; आमदार महेश लांडगे

पिंपरी : शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा पुरवण्यात हयगय करणाऱ्या जिल्हा प्रशासन तसेच, अन्न औषध प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. २१) पहाटे शहरासाठी दोन टँकर ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शहरातील सुमारे चार हजार रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात येणारा ऑक्सिजन टँकर मंगळवारी (ता. २०) सांयकाळी पुण्याकडे वळविण्यात आला होता. ही बाब महापालिका अधिकारी आणि भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या लक्षात आली. त्यानंतर प्रसंगावधान राखत तत्काळ कार्यवाही करण्यात आली. आज बुधवारी पहाटे ऑक्सिजनचे आणखी दोन टँकर उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयांसाठी आणलेला ऑक्सिजनचा एक टँकर सोमवारी (ता. १९) पिंपरी-चिंचवडला दिला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा प्रशासनाने ऐनवेळी ऑक्सिजन टँकर न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत लोकप्रतिनिधींनी विनवणी करण्यासाठी संपर्क केला; पण प्रतिसाद मिळाला नाही. यावर आमदार लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

पिंपरी-चिंचवडला आरोग्य सुविधांबाबत दुजाभाव केला जात असेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. शहरातील सुमारे ६०० रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. असे असताना जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे, अशी टीका लांडगे यांनी केली होती.

‘ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पुरेसा नाही’

पुणे जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला ऑक्सिजन साठा दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांची धावपळ सुरू आहे. शहरातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, तर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन टँकरबाबत सकारात्मक भूमिकेतून पिंपरी-चिंचवडकरांच्या भावनांचा विचार करावा. तसेच, ऑक्सिजन उत्पादनाचे स्रोत निर्माण करावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT