पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो महापालिकेनं दिली कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज वाटप आणि स्वीकृतीची मुदत 15 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, इच्छुकांनी अर्ज करावेत. रविवारपर्यंत (ता. 27) 15 हजार 664 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. 

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकांसाठी 11, मागासवर्गीय कल्याणकारी चार, अपंग कल्याणकारी आठ आणि इतर कल्याणकारी सात, अशा 30 योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी अनुक्रमे तीन हजार 466, चार हजार 850, एक हजार नऊ आणि सहा हजार 349 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा आहेत योजना 

  • महिला व बालकल्याण : दहावीतील मुलींना शैक्षणिक साहित्य खरेदी, बारावीनंतर उच्च शिक्षण, परदेशातील उच्च शिक्षण, विधवा व घटस्फोटीतांना अर्थसाहाय्य, सामाजिक व वैयक्तिक स्वरूपात सावित्रीबाई फुले पुरस्कार, दीड वर्षे व दहा वर्षे पूर्ण बचतगटास अर्थसाहाय्य, मुलींना तांत्रिक व अभियांत्रिकी पदविका शिक्षण, एका मुलीवर किंवा पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला व मुलगी दत्तक घेणाऱ्या दांपत्यास अर्थसाहाय्य. 
  • मागासवर्गीय कल्याणकारी : परदेशातील उच्चशिक्षण, मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना घरबांधणी, उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य. पाचवी व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. 
  • अपंग कल्याणकारी : विशेष व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्था किंवा पालक, दिव्यांगांना उपयुक्त साहित्य खरेदी, दिव्यांग व अपंग जोडप्यांना विवाहासाठी अर्थसाहाय्य. पाच ते 18 वर्षे वयोगटातील शाळेत न जाऊ शकणाऱ्या दिव्यांग मुलांना दरमहा अर्थसाहाय्य. पहिली ते अठरा वर्षापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. अपंगांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य. पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजना अर्थसाहाय्य. कुष्ठ पीडितांना अर्थसाहाय्य. 
  • इतर कल्याणकारी : पहिली ते पदव्यूत्तरपर्यंत शिक्षण घेणारे अनाथ, निराधार मुले, एचआयव्ही बाधितांना पीएमपीतून मोफत प्रवास पास. दहावी 80 ते 90 टक्के गुण असणारे विद्यार्थी. 18 वर्षांखालील एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था वा पालक. बारावीत 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. दहावीत 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी. 

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT