पिंपरी-चिंचवड

क्रांतीदिनानिमित्त क्रांतिवीरांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे पुतळे, दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक सुरेश भोईर, राजू बनसोडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. दापोडी येथील हुतात्मा नारायण दाभाडे पुतळ्यास त्यांचे नातू धनंजय दाभाडे, सुरेश दाभाडे, सरोज दाभाडे, नाना वानखेडे, राजेंद्र व सूर्यकांत खोल्लम यांनीही अभिवादन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉंग्रेसतर्फे हुतात्म्यांना अभिवादन 

हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा नारायण दाभाडे आणि हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी व स्फुर्तीदायी आहे. या हुतात्म्यांनी तरुणपणीच स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान आहे. या हुतात्म्यांचा इतिहास भावीपिढीला समजावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथे शहराच्या प्रवेशव्दाराजवळ क्रांतिस्थळ विकसित करावे. यामध्ये तीनही हुतात्म्यांचे पुर्णाकृती पुतळे व समुहशिल्प उभारावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली. क्रांतिदिनानिमित्त शहर कॉंग्रेसतर्फे क्रांतिवीरांना अभिवादन करताना साठे बोलत होते. माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, शहर सरचिटणीस भाऊसाहेब मुगूटमल, हिरामण खवळे, सुनिल राऊत, प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सोशल मिडीया सेल शहराध्यक्ष चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, गौरव चौधरी, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT