पिंपरी-चिंचवड

प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र; आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत.

पिंपरी - प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात कारवाई तीव्र करा, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पर्यावरणाला नुकसान पोचविणाऱ्या प्लास्टिकच्या विरोधात महापालिकेने बुधवारी (ता.१८) जोरदार मोहीम हाती घेतली आहे. सकाळच्या वेळेत पिंपरी मार्केटमध्ये महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेले. मात्र, कारवाई होत असल्याचे पाहताच बहुतांश व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली. कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. परिणामी, व्यापाऱ्यांनी तब्बल अडीच तास दुकाने बंद केली.

प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाईला सुरवात केली आहे. महापालिकेचे पथक पिंपरी मार्केटमध्ये पोचले. दरम्यान, व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. व्यापाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या आरोपांचा भडिमार केला. त्यामुळे काहीकाळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुपारी १ ते अडीच वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली. आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनतर व्यापाऱ्यांनी दुकाने खुली केली.

दरम्यान, प्लॅस्टिक वापरावर बंदी आहे. महापालिकेने प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात कारवाई तीव्र केली आहे. त्यानुसार सकाळीच पथकाकडून पिंपरी कॅम्पात गेले होते. प्लॅस्टिक वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली. पथकाने ८ ते ९ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. एका ड्रायफ्रुटच्या दुकानात कारवाई दरम्यान, व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. काही ठिकाणी पाच हजार तर काही ठिकाणी दोन हजार दंडात्मक पावत्या फाडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. आमच्याकडे प्लास्टिक नियमानुसार वापरण्यास परवानगी असलेल्या जाडीच्या बॅगा आहेत, असे असतानाही कारवाई कशी केली जात आहे? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला. प्लास्टिक उत्पादकांच्या दुकानात तपासणीऐवजी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकांनाची तपासणी करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT