pcmc
pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : आगाऊ कर भरल्यास सवलत; महापालिका स्थायी समितीने कर दर केले निश्चित

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर व करेत्तर बाबींचे दर निश्चित करणे, नवीन मिळकतीच्या संपूर्ण कराची आगाऊ रक्कम भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत देण्यासाठी महापालिका सभेकडे शिफारस करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.‌ कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत वार्षिक ठेकेदारी पद्धतीने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसर व उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणे, 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात तसेच कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग २ व ६ मध्ये आणि पिंपळे सौदागर, विश्वशांती कॉलनी, काटेवस्ती, गावठाण परिसरात, पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वेणूनगर, दत्त मंदीर, रहाटणी, रामनगर, शिवराजनगर येथील जलःनिसारण नलिका व मॅनहोल चेंबर्सची दुरुस्ती व देखभालज्ञखर्चास मान्यता दिली.

अन्य मंजूर विषय

- चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, किवळे, विकासनगर, दत्तनगर, बापदेवनगर, आदर्शनगर, मामुर्डी, साईनगर, आदर्शनगर, आझादनगर परिसरातील जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व ड्रेनेज लाईन्स व चेंबर्सची दुरुस्ती करणे

- कासारवाडी गेटाखालील रस्त्याची दुरुस्ती करणे

- निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात महावितरण कंपनीस उच्च दाब वीजभार वाढवणे

- पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या १८ मीटर डीपी रस्त्यास सब-वे करणे

- रावेत येथील मुख्य जलवाहिनीस अडथळा करणाऱ्या २२ केव्ही भूमिगत केबल बदलणे

- मेट्रो प्रकल्पांतर्गत दापोडी ते पिंपरी मेट्रो पुलाखाली सुशोभित खांब व दिवे बसवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT