पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ हजार १४३ नागरिकांची कोरोनाबाबत बेफिकिरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ‘दंड भरू पण, नियम मोडूच,’ अशीच वृत्ती शहरातील काही नागरिकांची दिसते आहे. कारण, कोरोना प्रतिबंधक सूचना व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४५ हजार १४३ नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आजपर्यंत दोन कोटी आठ लाख २९ हजार ९१४ रुपये दंड वसूल केला आहे. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी व प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी महापालिका विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करू नये, नियमानुसार परवानगी घेऊन व्यक्ती संख्येच्या मर्यादा पाळून कार्यक्रमाचे आयोजन करावे, आदी सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तसेच, रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदीही केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विविध सूचना आणि आदेशांचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना वारंवार केले जात आहे. तरीही काही नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करताना आढळत आहेत. 

- नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भरारी पथकांची नियुक्ती 
- पथकात महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांचा समावेश 
- पथकांद्वारे मंगल कार्यालये, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, विविध कार्यालये, हॉटेल्स्, महत्त्वाच्या बाजारपेठा, चौक, आस्थापना, भाजी मंडई अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी 
- विनामास्क आढळणाऱ्या, व्यक्ती-व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई 

‘‘सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे. नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.’’ 
- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका 

दृष्टीक्षेपात कारवाई  

  • विनामास्क व्यक्ती : ३९,८२७ 
  • दंड वसूल : १,९९,१३,५१४ 
    थुंकणाऱ्या व्यक्ती : ५,२८६ 
  • दंड वसूल : ८,४१,४०० 
  • गर्दी करणारे : ३० 
  • दंड वसूल : ७५,००० 
  • एकूण व्यक्ती कारवाई : ४५,१४३ 
  • एकूण दंड वसूल : २,०८,२९,९१४ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT