NCP Esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी महापालिका मिशन-२०२२चा ‘राष्ट्रवादी’कडून आढावा

पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. त्या बैठकीच्या नियोजनासह २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

आमदार बनसोडे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, काळूराम पवार, विजय कापसे, मनोज खानोलकर, प्रसाद शेट्टी, हरेश आसवानी, तानाजी खाडे, जगन्नाथ साबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सनी ओव्हाळ, श्यामराव वाल्हेकर, राजेंद्र जगताप, पंडित गवळी, कैलास थोपटे, अंकुश पठारे, किरण मोटे, श्रीरंग शिंदे, रामआधार धारिया, रमा ओव्हाळ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते, शरद पवार यांनीसुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे, या मागणीसाठी आमदार बनसोडे व माजी आमदार लांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ व माजी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारासह विकासकामांच्या मुद्यांवर चर्चा झाली होती. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १३ ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवकांची बैठक घेण्यास पवार यांनी परवानगी दिली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचा मेळावा घेण्यासही संमती दाखविली आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली.

बैठकीत काय ठरले...

कार्यकारिणी जाहीर करून सत्कार करावा

महिलांचा समावेश असावा

ज्येष्ठांनी पक्षाला, माजी नगरसेवकांना ताकद द्यावी

निवडणुकीतील मुद्दे व सत्ताधाऱ्यांना शह कसा द्यायचा

बैठकीचे ठिकाण निवडणे, सर्वांना निमंत्रण देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT