money esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

दिवाळी सव्वा महिन्यावर असताना महापालिकेने मंगळवारीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - दिवाळी सव्वा महिन्यावर असताना महापालिकेने मंगळवारीच (ता. २८) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. सर्वांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदानासह २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान दिले जाते. गेल्या वर्षापासून सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढत आहेत. या संकटाच्या काळात त्यांचे योगदान मोठे आहे, असे सांगून महापौरांनी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करत असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.

पंचवार्षिक करार होणार

महापालिका व कर्मचारी महासंघ यांच्यात दर पाच वर्षांनी करार होतो. गेल्या वर्षी कराराची मुदत संपली. मात्र, कोरोनामुळे नव्याने करार झाला नव्हता. आता पुढील पाच वर्षांसाठी अर्थात २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी नवीन करार करण्यात येणार आहे. त्या बाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील योगदान मोठे आहे. त्यांचे शहर विकासातील योगदानही मोठे आहे. त्यामुळे प्रथेनुसार दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान व जादा बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पुढील पाच वर्षांचा करारही केला जाणार आहे.

- उषा ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड

कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वजण घरात बसलेले होते. त्यावेळी केवळ पालिकेचे कर्मचारी व अधिकारी कामावर होते. त्यांनी चांगले काम केल्यामुळे शहराचा मृत्यूदरही कमी राहिला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची ही पावती आहे.

- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Kerala Puducherry Elections : सत्तेचा महासंग्राम! आसाम,केरळ,पुद्दुचेरीत आज मतदान; ५.३ कोटी मतदार निवडणार सरकार

सोलापुरात ‘डीजे’ला बंदीच; ‘डीजे’ला परवानगी नाहीच; पोलिस दोनदा मोजणार आवाज: ग्रामीण पोलिसांनी मंडळांना दिली ‘नो डीजे नो डॉल्बी’ची शपथ, वाचा...

आजचे राशिभविष्य - ०९ एप्रिल २०२६

उजनीतून शेतीसाठी ३० मेपर्यंत पाणी! एप्रिलअखेर सुटणार भीमा नदीत पाणी; १५ मेनंतर धरण उणे पातळीत, सोलापूर शहराला जाणवणार नाही टंचाई, वाचा...

अग्रलेख : धुपाटण्याचे धनी!

SCROLL FOR NEXT