PCMC
PCMC 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांचे उपोषण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका कर्मचाऱ्यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून विमा पॉलिसी चालू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. त्यावर धन्वंतरी योजना बंद करण्याची मागणी करीत कर्मचारी महासंघाने बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केले. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेने पाठिंबा दर्शविला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दहा वर्षांपासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे. दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. महापालिका व सरकारी रुग्णालयांसह अन्य खासगी रुग्णालयांतही अनेकांनी उपचार घेतले आहेत. मात्र, धन्वंतरी स्वास्थ्य योजनेऐवजी विमा पॉलिसी लागू करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. महापालिका सर्वसाधारण सभेने त्या प्रस्तावास गेल्या वर्षीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू गेली आहे. मात्र, कर्मचारी महासंघाने त्याला विरोध केला आहे. विमा योजनेऐवजी धन्वंतरी योजनाच सुरू ठेवावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यासाठी वेळोवेळी काम बंद आंदोलन, ठिय्या आंदोलन, काळ्या फिती लावून आंदोलन केली आहेत. आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, राहुल भोसले, समीर मासुळकर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आंदोलन स्थळी येऊन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

सर्वसाधारण सभेत पडसाद 
महापालिका सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. त्यात धन्वंतरी योजनेसाठी 21 कोटी रुपये तरतूद वर्गीकरणाचा विषय होता. विषयाचे वाचन सुरू असतानाच अनुमोदन देण्यात आले आणि पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी विषयाला मंजुरी दिली. त्यानंतर काही नगरसेवकांनी अजेंडा फाडून सभागृहात भिरकवला. "संबंधित विषयावर आम्हाला बोलू दिले नाही' असा आक्षेप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला. या गोंधळातच पुढचे पाच विषय मंजूर करून महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

आठ फेब्रुवारीला सुनावणी 
कर्मचारी महासंघाचा विरोध असतानाही आयुक्तांनी विमा योजना लागू केल्याच्याविरुद्ध महासंघाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवार सुनावणी झाली. "पुढील सुनावणी होईपर्यंत धन्वंतरी योजना बंद करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे,' महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले. पुढील सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT