पिंपरी-चिंचवड

सोलापूरच्या उपमहापौराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण वाचा...  

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एकच फ्लॅट अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली. राजेश दिलीप काळे (वय 42) असे अटक केलेल्या उपमहापौराचे नाव आहे. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे निलख येथील औदुंबर सोसायटीत एक फ्लॅट घेतला होता. हा एकच फ्लॅट बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी अनेकांना विकला. यातून अनेकांची फसवणूक झाली. 

याप्रकरणी 2019 मध्ये सांगवी पोलिस ठाण्यात 420, 34 या कलमांतर्गत, तर 2007 मध्ये निगडी पोलिस ठाण्यात 420, 467, 468, 471 या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे.  या गुन्ह्यात काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र पन्हाळे, कॉन्स्टेबल दत्तात्रेय नांगरे, संतोष डामसे यांचे पथक शुक्रवारी (ता. 29) सकाळी सोलापूरला रवाना झाले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपीला घेऊन हे पथक रात्री  शहरात दाखल झाले. त्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात रात्री उशिरा काळे यांना अटक करण्यात आली. सांगवी पोलिसांचा तपास झाल्यानंतर आरोपीला निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT