पिंपरी-चिंचवड

दुहेरी खून अन् पत्नीचं अपहरण करणारा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : किरकोळ कारणावरून चाकूने वार करून सासरा व मेहुण्याचा खून केला. त्यानंतर आजे सासऱ्यावर प्राणघातक हल्ला करीत पत्नीचे अपहरण करून अमरावतीहून पिंपरी-चिंचवड शहरात पळून आलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. 

रवी सुरेश पर्वतकर (वय 23, रा. महावीर कॉलनी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा रविवारी (ता. 14) पत्नी हर्षा यांना आणण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील कुरडपूर्णा येथे सासरी गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून त्याचे सासरच्या लोकांशी भांडण झाले. यातून आरोपीने त्याचा सासरा बंडू साबळे, मेहुणा धनंजय साबळे यांचा चाकूने वार करून खून केला, तर आजे सासरे विश्वनाथ साबळे यांच्यावरही चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर पत्नी हर्षा यांना जबरदस्तीने घेऊन आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला आला. याबाबत चांदूर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोपी रवी हा सोमवारी (ता. 15) भोसरी, मोशी परिसरात आल्याची माहिती युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला कुरुळी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक निरीक्षक उमेश लोंढे, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी अमित खानविलकर, सोमनाथ बोऱ्हाडे, गणेश महाडिक, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, मंगल वलवे, मंजुषा राजोळे यांच्या पथकाने केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT