Pimpri-Chinchwad police have registered another case against Gajanan and his accomplices 
पिंपरी-चिंचवड

गुंड गजानन मारणेसह त्याच्या साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून मोठी मिरवणूक काढली. मुंबई बंगळुरू महामार्गावरील पवना पूल ते चांदणी चौक या मार्गावर हा प्रकार घटला. तीस ते पस्तीस वाहनातून बेकायदेशीर रॅली काढून बेकायदेशीर जमाव जमवून वाहन चालकांना शिविगाळ करीत दहशतीचे वातावरण निर्माण केली. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिरगाव पोलिस चौकीत पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरूड) व त्याच्या 100 ते 150 समर्थकांकर गुन्हा दाखल आहे. पप्पू गावडे व अमोल बधे खून प्रकरणात मारणे याची निर्दोष मुक्तता झाल्याने सोमवारी (ता. 15) सायंकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर कारागृहाबाहेर गर्दी केलेल्या त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून घरापर्यंत मारणे याची मिरवणूक काढली. दरम्यान, पवना पूल ते चांदणी चौक या मार्गावर दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तीस ते पस्तीस वाहनांमधून आलेल्या मारणे व त्याच्या दीडशे ते दोनशे समर्थकांनी घोषणाबाजी करीत बेकायदेशीर रॅली काढली. इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता त्यांना शिविगाळ करीत दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांनी वाहन चालकांना थांबण्याचा इशारा केला असता ते निघून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच शिरगाव पोलिस चौकीतही मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

Sunil Tatkare: पुणे पदवीधर’ न मिळणे हे अपयश, राष्ट्रवादीची हक्काची जागा होती :सुनील तटकरे यांची कबुली

Rahul Gandhi : ‘एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही’, राहुल गांधी यांच्या टार्गेटवर कोण? सोशल मीडिया पोस्टने खळबळ

IND vs WI: अरे भारीच...! बॉल नीट दिसला नाही, तरी ईशान किशनने बाऊंड्रीजवळ घेतला अफालूनत कॅच, Video एकदा पाहाच

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT