rte sakal
पिंपरी-चिंचवड

RTE Admission Fee : खासगी शाळा पालकांकडून उकळताहेत ‘आरटीई’ शुल्क! पालकांच्या तक्रारी

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक संस्थांनी पालकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, असे सरकारचे आदेश असतानाही शहरातील काही शिक्षण संस्थांनी पालकांकडून शुल्क घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर शाळांनी वसूल केलेले शुल्क पालकांना तत्काळ परत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अन्यथा चौकशी करून संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाइन आणि लॉटरी पद्धतीने चालते. आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या शाळांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, त्या शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यासाठी २५ टक्के राखीव प्रवेश नियम दोन-१३ मधील सात क्रमांकाच्या तरतुदीप्रमाणे कोट्यातून प्रवेश मिळालेल्या बालकांकडून अथवा त्यांच्या पालकांकडून माहिती पत्रकासह नोंदणी शुल्क, शिक्षण शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क अथवा निधी शाळांना घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश असतानादेखील शहरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना ‘आधी शुल्क भरा, राज्य सरकारकडून अनुदान आल्यावर तुमचे शुल्क तुम्हाला परत देऊ’ असे सांगून पालकांकडून पैसे घेतले जात आहेत.

मात्र, राज्य सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतरही शाळेने शुल्क परत दिले नाही. ज्या शाळांनी अशाप्रकारे शुल्क घेतले, त्यांच्यावर कारवाई करून पालकांना पैसे परत करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

शुल्क वसुलीबाबत शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार तत्काळ चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांनी शुल्क घेतले आहे, ते शुल्क पालकांना परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना आपापल्या कक्षेतील सर्व शाळांना आदेश निदर्शनास आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT