Maruti Bhapkar Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : खड्ड्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पिंपरी शहरात मागील आठ-दहा दिवसांपासून पाऊस होता. या पावसात नव्याने बनवण्यात आलेले डांबरी रस्ते वाहून जाणे या रस्त्यांवर खड्डे पडणे, असे प्रकार समोर आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी शहरात मागील आठ-दहा दिवसांपासून पाऊस होता. या पावसात नव्याने बनवण्यात आलेले डांबरी रस्ते वाहून जाणे या रस्त्यांवर खड्डे पडणे, असे प्रकार समोर आले आहेत.

पिंपरी - शहरातील रस्त्याच्या खड्ड्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण तपासणारी संस्था याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

शहरात मागील आठ-दहा दिवसांपासून पाऊस होता. या पावसात नव्याने बनवण्यात आलेले डांबरी रस्ते वाहून जाणे या रस्त्यांवर खड्डे पडणे, असे प्रकार समोर आले आहेत. खरे तर हा आपल्या प्रशासनाच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभाराचा पुरावाच शहरवासीयांच्या समोर आला आहे. त्यामुळे ज्या रस्त्यांवर हे खड्डे पडले आहेत, ते रस्ते बनवणारे ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण संस्था यांच्या संगणमताच्या भ्रष्टाचारामुळेच शहरवासीयांच्या जीविताला हा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेत त्या रस्त्यांच्या कामाची आपण चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी. झालेला खर्च ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण संस्था यांच्याकडून वसूल करावा, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

शहरातील ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा

शहरातील आठ ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील २३८ खड्डे डांबरणाने भरण्यात आले. बीबीएमने ५३ खड्डे भरण्यात आले. डब्लूएमएमने ३९७ खड्डे भरण्यात आले. पेव्हिंग ब्लॉगने ३२ खड्डे भरण्यात आले, मुरूम; खडीने १२६ खड्डे भरण्यात आले, असे एकूण ८४६ खड्डे भरण्यात आले. शहरातील ८० टक्के खड्डे भरण्यात आले असून, उर्वरित २० टक्के खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, असा दावा शहर अभियंता मकरंद निकम यांनी नुकताच केला आहे, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

हसायला येत नसलं तरी खोटं हसते सई ताम्हणकर? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बद्दल स्पष्टच म्हणाली अभिनेत्री, म्हणते- सेटवर जबरदस्ती...

Latest Marathi News Live Update : पुण्यात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना

SCROLL FOR NEXT