BJP sakal
पिंपरी-चिंचवड

नारायण राणे यांचा पिंपरी चिंचवड शिवसेना व युवासेनेकडून निषेध

पुणे- मुंबई महामार्ग पिंपरी चौकात रोखला भाजपच्या मोरवाडी कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषय आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व युवासेनेने निषेध केला. शिवसेनेने पिंपरी चौकात पुणे-मुंबई महामार्ग रोखला. तर, राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. दरम्यान, शिवसेनेने भाजपच्या मोरवाडी कार्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलन केले.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी शब्दप्रयोग केला होता. अपशब्दही वापरले होते. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शिवसेनेने पिंपरी चौकात आंदोलन केले. शहर प्रमुख सचिन भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले.

दरम्यान, युवा सेनेचे शहर प्रमुख विश्वजीत बारणे, शहर समन्वयक रुपेश कदम, माउली जगताप, राजेंद्र तरस, नीलेश हाके, प्रतिक्षा घुले यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi highway landing: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाचे हायवेवर आपत्कालीन लँडिंग, थरारक Video पाहा

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री रणजीत देशमुख यांना बजावलेला अजामीन पात्र अटक वॉरंट रद्द

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

SCROLL FOR NEXT