Pimpri Chinchwad Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad: मामुर्डी ते वाकड वाहतुकीस वेग; मुंबई-बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रस्तावित

एकूण ६० मीटर महामार्गालगत महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी - मुंबई-बंगळूर महामार्ग अर्थात देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग शहरातून जातो. त्यावरील मामुर्डी गावापासून वाकड येथील मुळा नदीवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूंस प्रत्येकी बारा मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे.

तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित केला जाणार आहे. त्यास प्राधिकरणाने परवानगी दिल्याने महापालिकेने भूसंपादन कार्यवाही सुरू केली आहे. बाधित शेतकऱ्यांकडून भूसंपादन प्रस्ताव दाखल करण्याची कार्यवाही गुरुवारपासून (ता. १७) सुरू झाली.

महापालिका हद्दीत मामुर्डीपासून वाकडपर्यंत मुंबई-बंगळूर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८) ६० मीटर रुंद आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएनएआय) दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ मीटर रुंद सेवा रस्ता विकसित केला आहे.

एकूण ६० मीटर महामार्गालगत महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे. तो विकसित करण्याची तयारी प्राधिकरणाने दाखवली आहे. त्यासाठी महापालिकेने भूसंपादन करून द्यायचे आहे. अर्थात रस्त्यासाठी महापालिकेने जागा ताब्यात घेऊन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करायची आहे.

एकूण ६० मीटर महामार्गालगत महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे.

असा मिळेल मोबदला

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या जागा मालकांना हस्तांतर विकास हक्क अर्थात टीडीआर (ट्रान्स्फर ॲण्ड डेव्हलपमेंट राइट्स) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआयद्वारे (फ्लोअर स्पेस इंडेक्स) मोबदला दिला जाणार आहे.

या बदल्यात जमिनीचा आगाऊ ताबा देण्यासाठी महापालिका नगररचना विभागाने जागा मालकांकडून प्रस्ताव मागितले आहेत. ते आल्यानंतर मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार ‘टीडीआर’ किंवा ‘एफएसआय’ महापालिकेकडून दिला जाणार आहे.

भूसंपादन कायद्यान्वये निवाडा जाहीर झाल्यास ‘टीडीआर’ किंवा ‘एफएसआय’चा पर्याय जमीन मालकास उपलब्ध नसेल. केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा रोख स्वरुपातील मोबदलाच देय राहील, असे नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT