pimpri chinchwad  sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad : पोलिस चौकीवर चढून दगडफेक, वैफल्यग्रस्त तरुणाचा दोन तास थरार

चाकण -तळेगाव मार्गावरील स्टेशन चौकाजवळील वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीच्या छतावर शुक्रवारी (ता. १) पहाटे वैफल्यग्रस्त तरुण बसला.

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव - तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीवर चढून एका वैफल्यग्रस्त तरुणाने केलेला दगडफेकीचा तब्बल दोन तासांचा थरार अनेकांच्या काळजाचे ठोके चुकविणारा होता. अखेर वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे ‘आपदा मित्र’ आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन मोठ्या शिताफीने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

चाकण-तळेगाव मार्गावरील स्टेशन चौकाजवळील वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीच्या छतावर शुक्रवारी (ता. १) पहाटे वैफल्यग्रस्त तरुण बसला. चौकीतील कर्मचाऱ्याच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही. सकाळी वर्दळ वाढताच तो तरुण छतावरील दगड वीटा फेकून मारू लागला.

हातात लोखंडी अँगल धरलेला तो व्यक्ती अंदाधुंद पद्धतीने हातवारे करीत दगड, वीटा रस्त्यावर फेकू लागला. तेव्हा मात्र, सर्वांची धांदल उडाली. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांसह पादचाऱ्यांची अचानक अंगावर येणाऱ्या दगडांमुळे घाबरून गेले. त्याने फेकलेल्या दगड विटांमुळे एक दोन वाहनांचे नुकसान झाले.

मात्र, सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. सर्वांना चिंता एकाच होती की चौकीलगत असलेल्या लोहमार्ग आणि अतिउच्चदाब वीजवाहक तारांवर त्याने उडी मारली तर होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेची.

वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार ओंकार पुरी यांनी या बाबत आपल्या वरिष्ठांसह तळेगाव दाभाडे पोलिसांनी या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर पोलिस, अग्निशमक दल आणि वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी भीती दाखवली तर त्याने चक्क वीट पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर भिरकावली.

चहा, खाद्यपदार्थ, दारू आणि अगदी पैशांचे अमिष दाखवले. अनेकांनी विनवण्या केल्या. मात्र, तो बहादर कुणाचे ऐकायला तयार नव्हता. खुद्द मुख्यमंत्री आले तरी मी खाली उतरणार नाही, अशा कडक इशारा दिला. शेवटी तरुणास वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक भास्कर माळी आणि गणेश पाटील यांनी धाडस दाखवत गुपचूप मागून त्याला पकडले.

या झटापटीत भास्कर माळी आणि तो तरुण चौकीच्या छतावरून खाली कोसळले. त्यात त्यांना किरकोळ खरचटले. खाली पडलेल्या मनोरुग्णाला तिकडे जमा झालेल्या प्रत्यक्षदर्शींनी जखडून ठेवत पोलिस चौकीच्या आत बसविले. मूळचा वाशीम जिल्ह्यातील असलेला रवी मुंडे हा बत्तीस वर्षीय तरुण चाकण ‘एमआयडीसी’मधील वासुली परिसरात काम करतो.

व्यसनमुक्तीवर औषधोपचार सुरू असताना बऱ्याच दिवसांनी अती मद्यसेवन केल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन ढळल्याचे त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न झाल्याचे पोलिस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी त्याला जनरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून पोलिस ठाण्यात आणून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. भर रस्त्यावर घडलेल्या या थराराचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे परिसरात या प्रकाराची दिवसभरचर्चा होती.

पोलिस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र नीलेश गराडे, भास्कर माळी, विश्वनाथ जावळीकर, गणेश ढोरे, सुधीर ससाणे यांच्यासह अग्निशमक दलाचे बाळू ठाकर, शेखर खोमने, धिरज शिंदे, गणेश जावळेकर आदींनी या बचाव कार्यात मोलाची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका आंदोलन

SCROLL FOR NEXT