वाकड sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad : वाकड मध्ये MNGL गॅसची मुख्य पाईपलाईन तुटली

ठेकेदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

वाकड : वाकड- दत्त मंदिर रस्त्याचे काम सुरू आहे. शनिवारी (ता. २९) सकाळी दहाच्या सुमारास उत्कर्ष चौकात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना वाकडला नॅचरल गॅस पुरवठा करणारी एमएनजीएलची मुख्य पाईपलाईन तुटली. सकाळी गडबडीच्या वेळेत गॅस पुरवठा खंडित झाल्याने या घटनेचा सुमारे तीनशे सोसायट्या व तीन हजार फ्लॅट धारकांना म्हणजेच जवळ-जवळ अर्ध्या वाकडला फटका बसला आहे.

सकाळी दहाच्या सुमारास ही लाईन तुटली त्यामुळे सकाळी ऑफिस, शाळा, कॉलेज जाण्याच्या धावपळीत घरातील गॅस गुल झाल्याने अनेकांना मोठा

मनःस्ताप सहन करावा लागत आहे. गृहिणींची तर जणू हात मोडावा अशी परिस्थिती झाली आहे. याबाबत वाकड मधील आयटी अभियंत्यांनी ट्विटरवर शेलक्या भाषेत आपला रोष व्यक्त करून रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या निष्काळजी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सध्या ही लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काम करताना रस्त्याखाली असलेल्या सर्व सेवा वाहिन्यांची माहिती संबंधित ठेकेदाराला असतेच किंबहुना अधिकारी सर्व माहिती नकाशा त्याला देतात मग तरीही हा निष्काळजी पणा कसा केला जातो. रस्त्याची कामे करताना वीज लाईन तुटते, पाणी लाईन तुटते आता तर गॅस लाईनच डॅमेज केली गेली आहे. या समस्यांचा आम्हाला वारंवार सामना करावा लागतो त्यामुळे या सर्व घटनांना महापालिकेचे निष्काळजी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी सकाळशी बोलताना केला.

ठेकेदाराला रस्त्याखालून गेलेल्या वाहिन्यांची व सर्व बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. जर त्याला माहीती नसेल तर त्याला कामे दिलीच कशी जातात? विकासकामांसाठी आजवर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे, धूळ, राडारोडा आम्ही सहन करतोयच आता मात्र ही समस्या हात धरूण चक्क घरापर्यंत आली. मुलभूत गरज असलेली गॅस लाईन तुटल्याने सर्वत्र खोळंबा झाला अन उपासमारीची वेळ आली आहे. दोषींवर कारवाई व्हावी.

- सचिन लोंढे उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT