Pimpri Chinchwad Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad: कोणत्या रस्त्यावरून नेऊ गाडी? चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटली पण वाहनचालक अजूनही कोंडीत

एनडीए चौकात आल्यानंतर देखील वाहनचालक संभ्रमित होतात.

सकाळ डिजिटल टीम

Pune News - चांदणी चौकातील वाहतूक कोंडी जरी सुटली, तरीही कोणत्या रस्त्याने जायचे, या कोंडीत वाहनचालक मात्र अजूनही अडकलेलेच आहेत. मार्गदर्शक फलक नसल्याने रस्ता चुकल्यावर वाहनचालकांना किमान दोन किलोमीटरचा फेरा पडतोय, यामुळे वेळही वाया जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून आठ रॅम्प, दोन सेवा रस्ता, दोन अंडरपास, चार पूल, १७ किलोमीटरचे रस्ते बांधले. मात्र, कोणता रस्ता, कुठे जातो हेच वाहनचालकांना समजत नाही. प्राधिकरणाने काही ठिकाणी फलक लावले आहेत. तर, काही रस्त्याजवळ फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. (Latest Marathi News)

या ठिकाणी हवेत फलक

वेदभवनच्या चौकात कोणतेच फलक नाहीत. या चौकातून एनडीए चौक, मुळशी, पाषाण व बावधनला जाता येते.

कोथरूडहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर फलक नाही.

एनडीए चौकात आल्यानंतर देखील वाहनचालक संभ्रमित होतात.

बावधन व मुळशीकडे जाणारा रस्ता सहजरीत्या लक्षात येत नाही.

आम्ही सर्वच ठिकाणी फलक लावलेले आहेत. वेदभवन चौकात काही दिवसांतच लावू. वाहनचालकांना जर अडचण येत असेल तर आवश्यक त्या ठिकाणी फलक लावले जातील.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh News: दिवाळीपूर्वी योगी सरकारकडून किमान वेतनाचे नवे दर जाहीर; १ ऑक्टोबरपासून सुधारित वेतन लागू

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ट्रेनमध्ये रात्री ११ नंतर मोबाईल चार्ज करता येणार नाही, नेमकं कारण काय?

Railway Recruitment 2026: पदवीधरांसाठी खुशखबर! रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिलेल्या संधीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

'तुम्ही निघा इथून!' अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना भर कार्यक्रमातून हाकललं? Video पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT