ycm hospital sakal
पिंपरी-चिंचवड

PCMC News : वायसीएम : दोन एक्सरे मशिन बंद; तपासण्यांसाठी रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) एक्सरे मशिन गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद आहेत. एकूण तीन मशीनपैकी दोन मशिन बंद असून, उर्वरित एक मशिनदेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

सकाळ वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) एक्सरे मशिन गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद आहेत. एकूण तीन मशीनपैकी दोन मशिन बंद असून, उर्वरित एक मशिनदेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) एक्सरे मशिन गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद आहेत. एकूण तीन मशीनपैकी दोन मशिन बंद असून, उर्वरित एक मशिनदेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सोनोग्राफी मशिनची देखील याच प्रकारे दुरवस्था झाली असल्याने रुग्णांच्या लांबच-लांब रांगा तपासणीसाठी लागत आहेत. परिणामी, रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.

‘वायसीएम’ रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. त्यापैकी, दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे. कोणत्याही आजारांची तपासणी करण्यासाठी एक्सरे व गर्भवतींसाठी सोनोग्राफी अत्यावश्यक आहे. डॉप्लर आणि सोनोग्राफीच्या इतर तपासणीसाठी तब्बल एक महिन्यांचे वेटिंग आहे. सध्या एक्सरे काढण्यासाठी रुग्णांना दिवसभर ताटकळत रुग्णालयात बसण्याची वेळ आली आहे. अतिग्रस्त आजार असलेले रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. एक्सरे काढल्यानंतर अनेकांना एक्सरेची फिल्म देखील मिळत नाही. शिवाय, या विभागातील कर्मचारीदेखील मशिन बंद असल्याने दिवसभर बसून असल्याचे चित्र आहे.

दिवसाकाठी सध्या ३०० ते ४०० रुग्णसंख्या केवळ एक्सरेसाठी दाखल होत आहेत. तर, सोनोग्राफीसाठी २०० ते ३०० दैनंदिन रुग्णसंख्या आहे. ट्रॉमा, फ्रॅक्चर, न्यूमोनिया, पोटाचे विकार, किडनी स्टोन, आतड्यांचे आजार, फुप्फुसाचे विकार आदी आजारांसाठी तातडीने एक्सरेची गरज भासत आहे. तर, किडनी स्टोन, लिव्हर, आतडे, ॲपेडिंक्स, लघवीचे विकार, कॅन्सर, गर्भाशय पिशवी, पिताशयाचे खडे आदी आजारांसाठी तत्काळ सोनोग्राफी लागत आहे. मात्र, नादुरुस्त मशिनमुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जादा शुल्क मोजत खासगी रुग्णालयात धाव घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

याबाबतची माहिती घेतो. ‘वायसीएम’चे डीन यांच्याशी संवाद साधतो.

- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT