Crime esakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Crime : तरुणीचा घातपात झाल्याचा संशय; अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार

तरुणीवर अत्याचार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त करीत यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. न्याय मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

सकाळ वृत्तसेवा

तरुणीवर अत्याचार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त करीत यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. न्याय मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

पिंपरी - तरुणीवर अत्याचार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त करीत यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. न्याय मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

पिंपरीतील खराळवाडी येथील तरुणी मंगळवारी रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह आईच्या ताब्यात दिला. दरम्यान, याबाबत कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचा जबाबही तरुणीच्या आईने पोलिसाना दिला.

त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खराळवाडी येथे आणला असता आई व बहिणीव्यतिरिक्त इतर नातेवाईकांनी संबंधित तरुणीवर अत्याचार करून तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ठेवला असून नातेवाईक तक्रार देण्यासाठी येरवडा पोलिस ठाण्यात गेले आहेत. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT