Uday Samant Sakal
पिंपरी-चिंचवड

Ministry Meeting : पिंपरी उद्योजकांच्या समस्येंवर मंत्रालयात उद्योग मंत्र्यांशी होणार बैठक

पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत उद्या बुधवारी (ता. २३) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होणार.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत उद्या बुधवारी (ता. २३) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होणार.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत उद्या बुधवारी (ता. २३) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या मागणीनुसार ही बैठक होणार आहे.

शनिवारी (ता. १९) विविध समस्या आणि मागणींबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी लघुउद्योजकांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे आश्‍वासन सामंत यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी बैठक लावली आहे.

शहरातील उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी शहराचा अवघ्या दीड महिन्यांत दोनदा दौरा आणि तात्काळ मंत्रालयात बैठक लावणारे उदय सामंत पहिले उद्योग मंत्री आहेत, अशा भावना लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केल्या.

मंत्रालयात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस लघुउद्योजक संघटनांसह लघु उद्योजक सदर बैठकीस उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्र्यांकडून संबंधित विभागाचे सचिव तसेच अधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

या विषयांवर होणार चर्चा

१) भुयारी गटार योजना व सीइटीपी प्लांट

२) खंडित वीज पुरवठा व वीज दरवाढ

३) एमएसईडीसीएलची सहा नवीन सबस्टेशन्स उभारणीबाबत

४) औद्योगिक परिसरातील कचरा समस्याबाबत

५) अग्निशमन केंद्र

६) वाहतूक व्यवस्था (बस सुविधा)

७) वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने

८) वाहतूक कोंडी

९) रेडझोन बाबत

१०) शास्तीकर रद्द करणेबाबत

११) महाराष्ट्रात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढविणेबाब

१२) महापालिकेकडून देण्यात येणार्या अपुर्या सुविधेबाबत

१३) लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध होणेबाबत

१४) एक खिडकी योजना

१५) सबसिडीबाबत

१६) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र

१७) औद्योगिक परिसरात होणार्या चोर्यांबाबत

१८) ट्रक टर्मिनल जागेबाबत

१९) वृक्ष लागवड व संवर्धनासाठी भूखंडबाबत

२०) संघटना ऑफिस भूखंडाबाबतही उद्योग मंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT