pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri: तोतया पोलिस उपनिरीक्षक, बँक मॅनेजर अटकेत

धमकी देणाऱ्या दोन तोतयांना सांगवी पोलिसांनी सृष्टी चौक येथेअटक केली.

सकाल वृत्तसेवा

पिंपरी : पोलिस उपनिरीक्षक व बँकेचा मॅनेजर असल्याची बतावणी करून दुकानदारांना कारवाई करण्याची धमकी देणाऱ्या दोन तोतयांना सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सांगवीतील सृष्टी चौक येथे करण्यात आली.

बुद्धभूषण अशोक कांबळे (वय २७, रा. म्हेत्रे वस्ती, टॉवरलाइन, निगडी) व औदुंबर भारत जाधव (वय २९, रा. स्मशानभूमीजवळ, कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे सांगवी परिसरात मंगळवारी (ता. ३१) रात्री साडेनऊच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सृष्टी चौकातील एका पान टपरीवर दोघेजण संशयितरीत्या थांबल्याचे निदर्शनास आले. त्यातील एकाने आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे, तर दुसऱ्याने एसबीआय बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले.

मात्र, त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यावर दोघेही तोतया असल्याचे समोर आले. एकाने पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासविण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता, तर दुसऱ्याने एसबीआय बँकेचा ड्रेस कोड परिधान केला होता. दोघे आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाऊन दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होते. या दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oracle Layoff: सकाळी 6 वाजताच 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं! 109 अब्ज डॉलरचे कर्ज तरी आज शेअर्स 6% वाढले; कारण काय?

Mumbai Ambegaon NCP felicitation: मुंबईत आंबेगाव तालुक्यासह राज्यातील नवनिर्वाचित स्थानिक स्वराज्य लोकप्रतिनिधींचा गौरव, शशिकांत शिंदे व देवदत्त निकम उपस्थित

Nanded वारकरी परिषदेच्या बैठकीनंतर घरी जाताना हायवा ट्रकने उडवलं. प्रसिद्ध किर्तनकाराचा जागीच मृत्यू

Kinwat Crop Damage: वादळी वारा-पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! किनवट तालुक्यातील ज्वारी पीक व आंबा बागेचे नुकसान, भरपाईची मागणी!

Latur News: बोधेनगराला आता पिवळ्या पाण्याची शिक्षा; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक मात्र झाले त्रस्त

SCROLL FOR NEXT