pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : शहरात कमी होतोय खाकी वर्दीचा धाक?

पोलिसांवरील हल्ले वाढले; सामान्यांमध्ये असुरक्षेची भावना

मंगेश पांडे

पिंपरी : पोलिसांना धमकी, धक्काबुक्की करण्यापासून मारहाण करण्यापर्यंत काही जणांचे धाडस वाढले आहे. थेट पोलिस ठाण्यात राडा घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक कमी होतोय का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्याचे असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलिस झटत आहेत. कोरोनाच्या भीतीने नागरिक घरात बसलेले असताना पोलिस मात्र सतत रस्त्यावर होते. या काळात त्यांनी मोलाची कामगिरी केली. मात्र, दरम्यानच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या वर्षात तब्बल ६९ घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सात घटनांची नोंद झाली आहे. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की अशा घटना कानावर पडत होत्या. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांवरच गुन्हेगार हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पोलिस ठाणेही असुरक्षित

बाहेर कितीही मस्ती केली तरी, पोलिस ठाण्यात आले की, भले भले गार पडतात, असे आजपर्यंत आपण ऐकत आलो. त्यामुळे पोलिसांच्या धाकाने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये, असेही बोलले जाते. मात्र, आता हा धाक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवडाभरात घडलेल्या दोन घटनेत आरोपीने पोलिस ठाण्यातच राडा घातला. देहूरोड ठाण्यात सहायक निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. चिंचवड पोलिस ठाण्यात एकाने धिंगाणा घालत पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली.

या महिन्यातील घटना

५ सप्टेंबर - भोसरी एमआयडीसीत तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकी

  1. ९ सप्टेंबर - तळवडे येथे दोघांनी वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकी दिली

  2. १८ सप्टेंबर - निगडी, प्राधिकरणात दोघांनी पोलिसांना तलवारीने मारून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून गेले. झटापट व शिवीगाळ केली

  3. २१ सप्टेंबर - देहूरोड पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली

  4. २२ सप्टेंबर - पिंपरीतील शगुन चौकात पाच जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेले

  5. २६ सप्टेंबर - चिंचवड पोलिस ठाण्यात एकाने पोलिसांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण केली

  6. २६ सप्टेंबर - थेरगावात घटनास्थळी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घातली, त्यांची कॉलर पकडली

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीची तक्रार एकूण घेत पोलिस कार्यवाही करीत असतात. कायदा हातात घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

- आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT