Ambulance Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सलग चार रुग्णवाहिका अडकल्या वाहतूक कोंडीत

शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. त्यानंतर चालक व मदतनीस निघून गेले. त्यामुळे अन्य वाहन चालकांना मागे फिरून जावे लागले. शिवाय, पोलिस शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. दहाच्या सुमारास कंटेनर काढायला सुरुवात झाली. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर ऑइल सांडल्याने एमआयडीसीतून वाहतूक वळवावी लागली. त्यामुळे कोंडी झाली होती. परिणामी, शनिवारी मुंबई व पुणे दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. पिंपरीतील कोंडीत चार रुग्णवाहिकांना अडकल्याने त्यांना वाट करून देताना पोलिसांना कसरत करावी लागली.

१३ तास अडकला कंटेनर

पिंपरीतील ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने निगडीकडे जाणारी सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांनी कंटेनरच्या चाकांमधील हवा सोडली. तरीही कंटेनर बाहेर निघाला नाही. सलग १३ तास कंटेनर अडकून राहिला. अखेर क्रेनने कंटेनर बाहेर काढला. परंतु, तोपर्यंत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस. त्यातच वेळ काढून कुटुंबातील उरलेली कामे मार्गी लावण्याची सर्वांची घाई. खराळवाडीसमोरील ग्रेडसेपरेपटरच्या भागात बॅरिकेटस लावले होते. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकांना वाट करून दिली. एक रुग्णवाहिका पिंपरी कॅम्पच्या व इतर रुग्णवाहिका सिग्नलहून चिंचवडच्या दिशेने गेल्या.

समन्वयाचा अभाव

ग्रेडसेपरेटरमध्ये कित्येकदा क्षमतेपेक्षा अधिक उंचीची वाहने व अवजड मालाची वाहने प्रवेश करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर वाहतूक कोंडी ओढवते. ग्रेडसेपरेटमध्ये वाहने अडकून छताचा भागही निखळण्याची भीती आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या असमन्वयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र, त्रास सहन करावा लागत आहे.

पंधरा दिवसांत दोन वेळा कंटेनर ग्रेडसेपरेटरमध्ये अडकले आहेत. नाशिकफाटा आणि निगडी दोन्ही बाजूच्या ग्रेडसेपरेटला ४. ५ मीटर वाहनांच्या उंचीचे बॅरिकेटस गरजेचे आहे. महापालिकेसोबत पत्रव्यवहार करणार आहे. कंटेनर अडकल्यानंतर नागरिकांनी ग्रेडसेपरेटरमध्ये न थांबवता वाट काढून जायला हवे होते.

- राजेंद्र कुंटे, वाहतूक पोलिस निरीक्षक, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT