पिंपरी : अन् शरीरावर डोकंच नसल्यासारखं वाटतंय... sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : अन् शरीरावर डोकंच नसल्यासारखं वाटतंय...

देवीचा कोप होईल, कुटुंबातील कोणीतरी दगावेल अशी भीती मनात बसली होती.

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी : ‘‘गेली १८ वर्षे चार फूट लांब आणि पाच किलो वजनाच्या जटा घेऊन फिरत होते. देवीचा कोप होईल, कुटुंबातील कोणीतरी दगावेल अशी भीती मनात बसली होती. जट काढली तर नातेवाईक, गावातील लोक काय म्हणतील? असा दबाव होता. म्हणूनच डोक्यावर ओझं सांभाळत आले. मात्र, एकेदिवशी हिय्या केला आणि भार उतरवला. आता मनावरचा आणि डोक्यावरचा ताण संपुष्टात आला असून शरीरावर डोकं आहे की नाही असं वाटतंय...’’ आळंदी देवाची येथील मनकर्णा खिलारे सांगत होत्या. गेल्या आठवड्यात. त्यांचे जटानिर्मूलन झाले.

यानिमित्त ‘सकाळ’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. ५५ वर्षीय मनकर्णा अतिशय आनंदी होत्या. गावात त्यांची भेट घेतली त्यावेळी त्या बाहेरच्या खोलीत बसून वेणीफणी करत होत्या. शेजारील मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या. तब्बल १८ वर्षांनी त्यांनी केसांना कंगवा लावला होता. सुवासिक तेल लावले होते. स्वत:ला आरशातही त्या वारंवार न्याहाळून पाहत होत्या. इतरवेळी डोक्यात उवा होत होत्या म्हणून सारखे विविध औषधोपचार त्यांचे सुरु होते. आता त्या नातेवाइकांनाही माझ्या केसांचा त्रास थांबल्याचे फोन वरुन सांगत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘‘इतकी वर्षे मी उगाच वाया घालवली, असे वाटते. माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. झोपताना होणारा त्रास थांबला. कुटुंबाने मला पाठिंबा दिल्याने मी जट काढून घेतली. इतरांनीही अशा प्रकारे पाठिंबा देवून सर्व महिलांचे दु:ख हलके करावे. जटनिर्मूलनाबद्दल जनजागृती करण्याचे काम मी करणार आहे.’’

त्यांचा मुलगा वाघेश्वर म्हणाला, ‘‘उगाच आईच्या मनाचा भ्रम होता. तिला आम्ही वारंवार सांगत होतो. ती काही वेळा एकत नव्हती. तिला वाटायचं की घरातील कोणी दगावेल. अखेर डॉक्टरांनीही तिला सल्ला दिला. शेवटी आई तयार झाली.’’

वर्षानुवर्षे असा असतो त्रास

वर्षानुवर्षे केस न विंचारल्याने प्रचंड उवा होतात. डोक्यात जखमा तयार होतात. डोक्यावर तीन ते नऊ किलोचे वजन वयाच्या चाळिशी ते साठीपर्यंत वागविल्याने पाठ व मानदुखीचे आजार जडतात. अस्वच्छतेमुळे इतर आजारही होतात. सतत खाज सुटल्याने मानसिक तोलही बिघडतो. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही घटल्याचे निदर्शनास येते.

समुपदेशन हाच उपाय

जट निर्मूलनास राजी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला सहा महिने ते वर्षभर समुपदेशन करावे लागते. कुटुंबाची व नातेवाइकांची समजूत काढावी लागते. कोणत्याही देवी देवतांचा व जटेचा संबंध नाही हे व्हिडिओ आणि उदाहरणे देवून समजून सांगावे लागते.

डोक्यापेक्षा मनातील जटा काढणे अवघड. बऱ्याच जणांना चार ते सहा महिने समुपदेशन करावे लागते. बऱ्याचदा कुटुंबातील सदस्यांचाही विरोध असतो. मात्र, एकदा विचार पटले की तत्काळ पाठिंबा मिळतो, संबंधित महिलांचाही विरोध मावळतो. ९४२२३०५९२९ या क्रमांकावर संपर्क साधला की आम्ही तत्काळ पोहोचतो.

नंदिनी जाधव, अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य

कान्हे फाटामध्ये राहणारी अनिता काटकर या माझ्या बहिणीच्या डोक्यातील जटा पाहिल्यानंतर मला कायम अस्वस्थ होत असे. परंतु, बहीण जटा काढण्यास तयार नव्हती. शेवटी माझ्या आग्रहास्तव रक्षाबंधनाची भेट म्हणून सर्व कुटुंबीयांच्या मदतीने तिने ती जट काढली.

- दिनेश गोणते, तळेगाव दाभाडे

जटानिर्मूलन संख्या

पुणे : २५

पिंपरी चिंचवड : ५

महाराष्ट्रभरातील १८ जिल्ह्यांमधून : १७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटील पोलिसांच्या रडारवर का आली? नेमकं प्रकरण काय? तपासाची चक्र फिरणार!

IND vs WI 1st Test Live: भारताचं रात्री अचानक ठरलं, जाहीर केला अचंबित करणारा निर्णय! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ड्रामा

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

Italy Road Accident : पर्यटनासाठी गेलेल्या अख्तर कुटुंबावर काळाचा घाला; इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू, मुलगी गंभीर

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

SCROLL FOR NEXT