kasarwadi sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सात वर्षांत घडविले २७ हजार चालक

कासारवाडीतील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग संस्थेची कामगिरी

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी : रस्ते अपघातातील वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे रस्ते अपघात कमी होण्यासाठी चालकांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण गरजेचे आहे. या हेतूने प्रशिक्षणाची गरज ओळखून कासारवाडी नाशिक फाटा येथील केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲंड रिसर्च संस्थेच्या (आयडीटीआरमध्ये) माध्यमांतून चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. २०१४ पासून प्रशिक्षणासाठी देशभरातून प्रशिक्षणार्थी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होत आहेत. २०१४ ते २०२१ या सात वर्षाच्या कालावधीत २७ हजारांच्यावर युवक-युवतींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत चालकांसाठी हे प्रशिक्षण राबविले जात आहे. कर्नाटक, हरियाना, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रभरातून हे प्रशिक्षणार्थी दाखल झाले आहेत. तीस दिवसांच्या कालावधीत रस्ते वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षेवर आधारित माहिती दिली जात आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य आहे. सध्या ब्रिस्टोन कंपनीच्या माध्यमातून सीएसआर उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. प्रशिक्षणासाठी एकूण दहा वाहने आहेत. त्यातील चार वाहने ही अवजड व सहा वाहने ही हलक्या स्वरूपाची आहेत. यामध्ये बस, ट्रेलर, डंपर, कारचा समावेश आहे. उरलेले इतर दिवसांमध्ये रस्त्यावर तसेच एस. एच. आठ आकडा, चढ-उतार, थ्री टर्न, फाइव्ह टर्न, तसेच टू लेन, सिक्सलेनच्या माध्यमातून व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण दिले जात आहे.

आतापर्यंत आयडीटीआरने यातील काही प्रशिक्षणार्थी एमएसआरटीसी, पीएमपीएल, तसेच विविध कंपन्यांना दिले आहेत. तांत्रिकदृष्ट्या चालक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सीएनजी, एलपीजीनंतर आता इलेक्ट्रीक वाहने बाजारात आली आहेत. त्याप्रमाणे प्रशिक्षणातही बदल करावे लागत आहेत. राज्य महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर अपघात कमी होण्यासाठी वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत.

- राजीव घाटोळे, प्राचार्य, आयडीटीआर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटील पोलिसांच्या रडारवर का आली? नेमकं प्रकरण काय? तपासाची चक्र फिरणार!

IND vs WI 1st Test Live: भारताचं रात्री अचानक ठरलं, जाहीर केला अचंबित करणारा निर्णय! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ड्रामा

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

Italy Road Accident : पर्यटनासाठी गेलेल्या अख्तर कुटुंबावर काळाचा घाला; इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू, मुलगी गंभीर

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

SCROLL FOR NEXT