Usha-Dhore sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : परदेशी नागरिकांना विमानतळ परिसरात अलगीकरण करा - महापौर

नागरीकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना विमानतळ परिसरात शासकीय सूचना अथवा नियमानुसार काही दिवसांसाठी अलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच शहरातील नागरीकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. तसेच शहरात देखील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे नव्याने सहा रुग्ण नुकतेच आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात जगभरातून ये जा करणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशातून येणारे प्रवासी नागरिक हे थेट पिंपरी चिंचवड शहरासह पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात इच्छित स्थळी जात असताना त्यांचे वाहनचालक, सहप्रवासी, मॉलमधील कर्मचारी किंवा इतर ठिकाणच्या नागरिकांशी संपर्क होऊ शकतो. या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

त्यामुळे ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढून संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व परदेशी नागरिकांचे विमानतळावर शासकीय सूचना अथवा नियमानुसार काही कालावधीसाठी अलगीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. पिंपरी चिंचवडसह पुणे व आजूबाजूच्या परिसरातील प्रवासी नागरिक हे विमानतळाबाहेर नागरी अथवा इतर रहिवासी भागामध्ये जाण्यासंबंधी कडक निर्बंध घालून त्यांची वेळीच वैद्यकीय तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

ओमिक्रॉन विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता तसेच नवीन रुग्णांचे वाढीस वेळीच आळा घालण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि विमानतळावर सक्तीचे अलगीकरण करणेबाबत आपणांकडून संबंधित यंत्रणेस सूचना व्हाव्यात, अशी मागणी महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही का? जाणून घ्या नवा नियम

IPL 2026 : शुभमन गिलच्या संघातील स्टार खेळाडूची नको ती कृती, Viral Video ने अनेकांच्या भुवया उंचावल्या... वादाला फुटले तोंड

Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Mumbai: मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुलभ! ‘ओएनडीसी’ प्लॅटफॉर्मवर बेस्ट तिकीट मिळणार

Latest Marathi News Live Update: अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मी आक्रमक

SCROLL FOR NEXT