Gangwar  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: पुन्हा मुळशी पॅटर्न - मोहोळ - शेलार टोळीयुद्धाचा भडका

म्हाळूंगेतील दगडफेकप्रकरणी महिनाभराने गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: कुख्यात गुंड शरद मोहोळ व विठ्ठल शेलार यांच्यातील टोळीयुद्धाचा भडका उडाला. व्यावसायिक वादातून म्हाळूंगे येथील एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याच्या कारणावरुन मोहोळ टोळीने एक महिन्यापूर्वी म्हाळुंगे येथे वाहनावंर दगडक केली. वाहनांवर कुंड्या फेकून काचा फोडत दहशत निर्माण केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात शरद मोहोळ याच्यासह दहा जणांवर महिनाभराने गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या घटनांवरून पुन्हा मुळशी पॅटर्न घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Also read:पान २

कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (रा. माऊलीनगर, सतारदरा, कोथरुड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरुड), मल्हारी मसुगडे (रा. ताजणे वस्ती कॉर्नर, माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहु हगवणे (वय ३०, रा. म्हाळुंगे) व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ८ जानेवारीला मध्यरात्री सव्वाबारा ते एकच्या दरम्यान घडली. गुंड विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे आले.

त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका गाडीत विठ्ठल शेलार असल्याचे समजून गाडीतून पळून जाणाऱ्या साथीदारांवर त्यांनी दगड व कुंड्या फेकून मारुन गंभीर हल्ला केला. तसेच राधा हॉटेल व तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडत परिसरात दहशत निर्माण केली.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना तब्ब्ल महिनाभरानंतर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुन्हा मुळशी पॅटर्न

यापूर्वी मुळशी तालुक्यात जमिनीच्या वादातून टोळीयुद्ध भडकले. यामध्ये काही जणांचा अंतही झाला. यावर आधारित मुळशी पॅटर्न चित्रपटही प्रदर्शित झाला. दरम्यान, टोळ्यांमधील वाद काहीसे थंडावले होते. मात्र, म्हाळुंगे येथील घटनेवरून पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT