Women Agitation Sakal
पिंपरी-चिंचवड

महिला आयोगासाठी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरीत आंदोलन

काही वर्षात महाराष्ट्रात महिला व बालिकांवरील अमानुष अत्याचाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - काही वर्षात महाराष्ट्रात महिला व बालिकांवरील अमानुष अत्याचाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नुकत्याच साकीनाका, वसई, उल्हासनगर, अमरावती, पुणे व पिंपरी-चिंचवड येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना याची साक्ष देत आहेत. मुंबई व पुण्यातील घटनेची अमानुषता पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का नाही? दिवसा घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या व विनयभंगाच्या घटना अत्यंत दाहक असून, राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तसेच तत्काळ राज्य महिला आयोग स्थापन करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी (ता.१६) आंदोलनादरम्यान केली आहे.

महिला सुरक्षेच्या व सन्मानाच्या संदर्भात धूळखात पडलेले अनेक ठराव ठोस व कठोर अशा कायद्यांच्या सूचना तसेच राज्यात राज्य महिला आयोगाची कमतरता हे राज्य सरकारच्या उदासीनतेचे व असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे. वंचित बहुजन महिला आघाडीने महिला सुरक्षा व सन्मानासाठी शहर, तालुका जिल्हा व राज्य पातळीवर जिजाऊ सुरक्षा पथक तसेच अहिल्या सुरक्षा पथक स्थापन करण्यात यावी ही मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतु महिलांच्या प्रश्नावर अद्याप सरकारकडून स्वतः किंवा वंचित बहुजन महिला आघाडीने सुचवलेल्या उपाययोजना व ठरावाच्या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. जेणेकरून कठोर व ठोस अशा कायद्याच्या माध्यमातून अशी अमानुष कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींना कायद्याद्वारे कठोर शासन होईल व त्यांना कायद्याचा धाक बसेल, अशी मागणी अध्यक्षा लता रोकडे, अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी अप्पर तहसीलदार, महिला व बालकल्याण विभाग, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT