pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : मोशी येथे महिलेचा खून केल्याची घटना

शरीरावर जखमा असल्याने खून झाल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोशी येथे महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी (ता.६) सकाळी उघडकीस आली.सरला साळवे (वय ३२, रा. मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.सोमवारी सकाळी सरला या घरात बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. याबाबत शेजारील रहिवाशांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत सरला यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अंगावर जखमा असून त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. दरम्यान, सरला यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला. याचा शोध पोलिस घेत आहेत.

याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिस आरोपीच्या मागावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT