पिंपरी-चिंचवड

पिंपरीत गुरुवारी सायंकाळी पाणी नाही; शुक्रवारी विस्कळित

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी रावेत येथील जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता.२९) शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळचा पुरवठा केल्यानंतर शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता असल्याचे आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहराला पुरवठा केला जातो. रावेत येथील अशुद्ध जलउपसा विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती, निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.


याच कामासाठी गुरुवारी शहरातील पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT